पावडर (फॉर्म्युला) चे दूध कसे तयार करावे?
सर्वप्रथम, एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, बाळासाठी आईचे दूधच सर्वोत्तम पर्याय आहे. निर्मात्याने अतिशय विचारांती आईच्या दुधाची निर्मिती केलेली आहे. आईचे दूध बाळाच्या गरजे प्रमाणे बदलू शकते! तसेच गरजे प्रमाणे वाढू शकते (तसेच न पाजल्यास झपाट्याने कमीही होऊ शकते!). बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले सहा महिने “पूर्णपणे फक्त आईचे दूध” बाळाला देणे अत्यावश्यक …